ICSE ISC RESULT 2024: १० वी, १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी! कुठे व कसा पाहाल आयसीएसईचा निकाल?

ICSE ISC Result 2024: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) आज ICSE, ISC चे निकाल जाहीर केले आहे. इयत्ता १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट – cisce.org, results.cisce.org वर पाहू शकतात. प्राप्त माहितीनुसार, इयत्ता १० वीच्या निकालात ९९. ४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर १२वीच्या परीक्षेत ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६ मे म्हणजेच आज निकाल जाहीर झाल्यानंतर १० मे पर्यंत पुनर्तपासणीसाठी अर्ज करता येणार आहे.

CISCE च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी यंदा बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९. ६५ इतकी असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९. ३१ इतकी आहे. आयएससी बोर्डात सुद्धा मुलीच मुलांच्या पुढे आहेत. ९८. ९२ टक्के मुली तर ९७. ५३ टक्के मुलं आयएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीच्या निकालामध्ये पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच ९९.९१ इतकी आहे. यापाठोपाठ दक्षिण क्षेत्रातील उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९. ८८ इतकी आहे. १३६६ शाळांपैकी सुमारे ६६.१८% (९०४ ) शाळांची उत्तीर्णतेची टक्केवारी १०० इतकी आहे.

(संपूर्ण वृत्त अपडेट होत आहे)

2024-05-06T09:48:12Z dg43tfdfdgfd