GOVT SAVINGS SCHEMES : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

PPF : बाजारात सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा देणारी योजना शोधून त्यात गुंतवणूक करण्याकडं प्रत्येकाचा कल असतो. अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) अत्यंत फायदेशीर ठरू शकते. दररोज फक्त २५० रुपये या हिशेबानं या योजनेत गुंतवणूक केल्यास २४ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो.

७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आणि कर लाभ

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवर भरघोस व्याज मिळते. शिवाय ही गुंतवणूक योजना सरकारी असल्यानं त्यात सुरक्षेची हमी मिळते. PPF योजनेतील गुंतवणुकीवर सध्या ७.१ टक्के व्याज दिले जाते. हे व्याज कमी-जास्त होत असते. यासोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टॅक्सचे फायदेही मिळतात. याचाच अर्थ उत्कृष्ट परताव्यासह कर बचतीच्या बाबतीतही ही योजना फायदेशीर ठरते.

हेही वाचा: सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

PPF योजना ही EEE (सूट-सूट-सूट) श्रेणीतील योजना आहे. या योजनेत दरवर्षी केलेली गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त राहते. याशिवाय गुंतवणूकदारांना मिळालेल्या व्याजावर तसेच मुदतपूर्तीवर मिळालेल्या निधीवर कोणताही कर भरावा लागत नाही.

२४ लाख कसे जमा होतात?

पीपीएफ योजनेत फक्त २५० रुपयांच्या रोजच्या बचतीसह २४ लाख रुपयांचा निधी कसा आणि केव्हा जमा करू शकतो याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. याची आकडेमोडही खूप सोपी आहे. जर तुम्ही रोज २५० रुपयांची बचत केली तर दरमहा तुमची बचत ७५०० रुपये होईल आणि वर्षाला तुम्ही ९०,००० रुपये वाचवाल. सलग १५ वर्षे याच प्रमाणात हे पैसे तुम्हाला गुंतवावे लागतील.

हेही वाचा: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

वास्तविक पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा १५ वर्षे आहे. या १५ वर्षांत तुमची एकूण जमा १३,५०,००० रुपये होईल आणि त्यावर ७.१ टक्के दराने व्याज बघितले तर ते १०,९०,९२६ रुपये होईल आणि मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला २४,४०,९२६ रुपये मिळतील.

५०० रुपये देऊन उघडता येते खाते

पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत तुम्ही फक्त ५०० रुपयांमध्ये खाते उघडू शकता आणि दरवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. परतावा आणि टॅक्स बेनिफिट्स व्यतिरिक्त कर्ज सुविधेचा लाभही यामध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे असुरक्षित कर्जाच्या तुलनेत पीपीएफ गुंतवणुकीवर घेतलेलं कर्ज स्वस्त असतं.

हेही वाचा: 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

या योजनेत गुंतवणूक अंतर्गत कर्ज तुमच्या ठेव रकमेच्या आधारे दिलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक टक्का जास्त रक्कम भरावी लागते. म्हणजेच जर आजघडीला तुम्ही पीपीएफ गुंतवणुकीतून कर्ज घेतलं तर तुम्हाला ८.१ टक्के दरानं व्याज मिळेल.

2024-05-07T07:31:35Z dg43tfdfdgfd