MAHARASHTRA WEATHER NEWS : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका

Maharashtra Weather News : इथं राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच हवामानाचेही काहीसे असेच तालरंग पाहायला मिळत आहेत. कोकण किनारपट्टी भागामध्ये समुद्रावरूनही उष्ण वारे वाहणार असल्यामुळं सूर्याचा दाह अधिक जाणवणार आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागामध्येही उकाडा अडचणी वाढवचाना दिसणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भात उष्ण रात्रींचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यासोबतच इथं ताशी 40-50 kmph वेगानं वारे वाहून हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला आहे. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचा : जशास तसा न्याय! बालात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

 

2024-05-07T02:51:36Z dg43tfdfdgfd