MHADA, CIDCO HOUSING LOTTERY : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या म्हाडा आणि सिडकोबाबत महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा आणि सिडकोने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना अनेकांना स्वस्तात घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा आणि सिडकोकडून जाहीर झालेल्या सोडतीत समाविष्ट असलेले आणि विक्रीविना उपलब्ध असणारी घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीसह इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यााचा निर्णय घेण्यात येणार आहेत. या निर्णायामुळे अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

म्हाडाचा निर्णयाचा सर्वसामान्यांना फायदा

म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांना हे घरं स्वस्त दरात घेता येणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना खिशाला परवडणाऱ्या दरात आणि कर्जाचा फार बोजा न देता शहरात किंवा शहराला लागूनच असणाऱ्या भागांतील विविध सोयीसुविधांसह ही घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

म्हाडानंतर सिडकोचाही महत्त्वाचा निर्णय

म्हाडाच्या या निर्णयानंतर सिडकोने देखील याच पावलावर पाऊल ठेवत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिडकोने देखील सोडतीव्यतिरिक्त विविध प्रकल्पांमधील उर्वरित घरांच्या विक्रीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वांगीन विचार करून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी एका वृत्तसमुहाशी संवाद साधताना दिली आहे. त्यामुळे अनेकांना सिडोकडून देखील हक्काचं घर घेण्यास मदत होणार आहे. घराच्या शोधात असलेल्या अनेक ग्राहकांना या निर्णायाचा फायदा होणार आहे.

कशा पद्धतीने मिळणार सवलतीत घरं?

मिळालेल्या माहितीनुसार विरार येथे म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळपास 5 हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यातील एकाच वेळी 100 घरांची नोंदणी करण्यास समर्थ असणाऱ्या शासकीय अथवा खासगी संस्थांना घरांच्या दरात 15 टक्क्यांनी सवलत देण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. त्यानतंर म्हाडाच्या या पावलावर पाऊल ठेवत आता सिडकोकडूनही प्रकल्पातील सोडतीतून उरलेल्या घरांची याच धर्तीवर विक्री करण्याचा विचार केला जात आहे. हे झाल्यास अनेकांना हक्काचं घर मिळणार आहे.

2024-04-26T15:59:50Z dg43tfdfdgfd