PIYUSH GOYAL: पियूष गोयल यांचा कांदिवलीमध्ये रोड शो, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

मुंबई : राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असून ठिकठिकाणी मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे आता मुंबई आणि पुण्यात प्रचाराला जोर आला आहे. महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. आज पुन्हा त्यांनी भव्य रॅली काढून मतदारांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियूष गोयल उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवत आहे. पियूष गोयल यांनी आज मंगळवारी कांदिवली पूर्व परिसरात रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नयन कदम, भाजप आमदार अतुल भातलकर, माजी खासदार गोपाल शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते इंद्रपाल सिंग, शिवसेना चे विकी मोकल, आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही प्रचार रॅली सराफनगरपासून सुरुवात झाली. त्यानंतर या रॅलीचा सांगता सुरभी सर्कलला झाली.

यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसंच मनसेचे कार्यकर्तेही रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान, गोयल यांनी मतदारांशी संवाद साधला.

मागील तीन दिवसांपासून पियूष गोयल यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सोमवारी पियूष गोयल यांनी विरोधकांना खोटं पाडून मालवणी कोळी गाव इथं पोहोचले आणि कोळी बांधवांशी संवाद साधत रॅली काढली. मालवणी कोळी गाव इथं सर्व पक्षाच्या कार्यकर्ते आणि ख्रिश्चन आणि कोळी बांधावं मोठ्या संख्याने उपस्थित होते. यावेळी कोळी बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात पियूष गोयल यांचं जोरदार स्वागत केलं होतं.

2024-05-07T12:17:27Z dg43tfdfdgfd